नि:स्वार्थ द्वारा वृक्ष लावून साजरा करण्यात आला वृक्षारोपण दिवस

एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्याचा संकल्प उराशी बाळगत निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन द्वारा प्रत्येक वर्षी वृक्षारोपण दिनाचे अवचित्त साधत वृक्ष लागवड करीत असतात. यावर्षी देखील दिनांक 1 जुलै 2022 रोजी हुडकेश्वर (खुर्द), नागपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे संतांचे वाक्य खरं करीत संस्थापक सचिन घोडे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर पर्यावरणाचे रक्षण कुठल्या ना कुठल्या माध्यमाने केले जाते.फक्त वृक्ष लावणे हाच संकल्प नसून , लावलेलं प्रत्येक झाड जगविणे हा निश्चयच जणू अंगी बाळगला आहे. त्याकरिता प्रत्येक झाडामागे त्याच्या देखरेखी करिता एक निःस्वार्थ संयोजक ठेवलेला आहे.आजवर लावलेली 200 ते 250 संपूर्ण झाडं ही मोठी झालेली आहे.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून जी.प.सदस्य सुभाष गुजरकर, पं. स.सदस्य वैशालीताई भोयर, गावच्या सरपंच मीनाताई शेंडे, उपसरपंच अभय भगत,मा. सरपंच कमलाकर शेंडे,ग्रामसेवक चंद्रकांत सोनवाने,खरेदी विक्री संचालक सुरेशजी घोडे,ग्राम सदस्या सिमाताई काष्टे, कृषी अधिकारी सोमाली कृशेकर,समाज सेवक प्रकाश भोयर,उपस्थित होते.त्यासोबतच निःस्वार्थ संयोजक सुमीत मेश्राम,गोपाल हटवार, शुभम हटवार, संकेत घोडे,दिलीप काष्टे,सत्यम मेश्राम,मनिष नवलकर,सुरेंद्र वैघ,विक्की धरमारे,तुषार देशमुख,सौरभ भगत,मयुर धरमारे,डाॅ.वुषाली नवलकर,हर्षाली घोडे,प्रीती गजभिये,पुष्पा बाळबुधे,प्रथमेश काष्टे,हरीश बाळबुधे,प्रशांत घोडे,शंकर ठाकरे,सुरेश वरठी,या सर्वाचे विषेष सहकार्य लाभले..




