निस्वार्थ द्वारा मतिमंद आदिवासी बांधवांना मिळाला मदतीचा हात

निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन चे संस्थापक श्री सचिन घोडे यांनी गरीब, गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा जणू वसाच घेतला आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, असो किंवा श्रावण बाळ योजना असो, राशन कार्ड सुविधा असो की बस कार्ड सुविधा असो अशा बऱ्याच शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा याकरिता सचिन जी निरंतर झटत असतात. यातच एक म्हणजे धामणा ,नागपूर ग्रामीण गावातील रहिवासी असलेले मरसकोल्हे कुटुंब. या कुटुंबातील तीनही अपत्य हे मतिमंद असून अतिशय हलाखीची परिस्थिती या कुटुंबाची आहे.आई – वडील रोजमजुरीचे काम करतात.योजना मंजूर झाल्याने या मुलांना शाषनाचा संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दर महिन्याला प्रत्येकी हजार रुपये मिळणार. या योजने करता लागणारे आवश्यक कागदपत्र बनविण्यासाठी येणारा खर्च न घेता स्वतःच्या खिशातून संपूर्ण पैसे भरून सचिन घोडे यांनी या मुलांना योजनेचा लाभ मिळवून दिला.