पीएचसी हुडकेश्वर खुर्द मध्ये जन्मलेल्या प्रथम चिमुकल्याचे निःस्वार्थ तर्फे स्वागत

गेल्या 3 -4 वर्षापासून आरोग्य उपकेंद्राची इमारत उभी असतानाही डॉक्टरांच्या अभावी हुडकेश्र्वर खुर्द येथील उपकेंद्रात आरोग्य उपचार मिळत नव्हते. परंतु गेल्या काही महिन्यात नि:स्वार्थ फाॅऊडेशन तथा गट ग्रामपंचायत,माजी पालकमंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे,आमदार श्री सावरकर साहेब जिल्हा परिषद श्री सुभाषजी गुजरकर,माजी सदस्या शुभांगीताई गायधने,पंचायत समिती सदस्या वैशाली ताई भोयर,संरपच मिनाताई शेंन्डे,माजी संरपच कमलाकरजी शेंन्डे,MO डाॅ.बडोदेकर मॅडम,श्री.डाॅ.डोंगरवार सर,डाॅ.निबांळकर या सर्वाच्या मदतीने आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले.आणि प्रथमच दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी एका महिलेची प्रसूती करण्यात आली.परिसरातील नागरिकांकरीता ही आनंदाची बाब होती.या खुशीच्या प्रसंगाला अविस्मरणीय करीत निःस्वार्थ संस्थापक सचिन घोडे यांचे द्वारा द्वारा येथील सहकारी N M बागडे मॅडम तसेच प्रसूती झालेली महिला सौ.सविता नितीन भगत यांचा दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी सत्कार करण्यात आला.त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित निस्वार्थ संयोजक लक्ष्मणजी बाळबुधे,ग्रापंचायत सदस्य अभयजी भगत आशा वर्कर सुजाताताई भगत,Mpl अमितजी भगत,गोपाल हटवार,सुरेद्र वैघ,विशाल धरमारे,अमित भगत या सर्वांची उपस्थिती लाभली…