हुडकेश्वर खुर्दच्या तंटामुक्ती समितीमुळे सुटला युवकांचा वाद

-तंटामुक्ती समिति अध्यक्ष सचिन घोडे यांचा यशस्वी प्रयत्न, ‘शांतता हिच सेवा’ – ठाणेदार कविता ईसारकर यांचा गौरोदगार
मागील 12 वर्षापासुन मा.गांधी तंटामुक्ती समिती हुडकेश्वर खुर्द गट ग्रामपंचायत येथे तंटामुक्त समिती चे अध्यक्ष सचिन घोडे असुन त्यांना १०० च्या वरुन तंटा, वाद – विवाद सोडविण्यात यश मिळाले आहे, पोलीस स्टेशन ला न जाता तंटामुक्त समिती च्या माध्यमातुन अनेक प्ररकारचे तंटे सोडविले जात असतात.त्यात घरघुती वाद, शेतजमीनीतील वाद,पारीवारीक तंटे अश्या अनेक प्रकारचे विवाद तंटामुक्ती समिती ने यशस्वी रीत्या पार पाडले आहेत. त्यातील एक नव्याने तयार झालेले भांडण म्हणजे दोन तरूणाचा वाद मारामारीवर पोहोचला, दोघांनी एकमेंकाच्या विरोधात पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार केल्या गेल्या, पंरतु जेव्हा तंटामुक्ती समितीला या गोष्टींची माहीती मिळताच त्वरित पोलीस स्टेशन ला जाऊन पोलीस निरीक्षक ईसारकर मॅडम यांची भेट घेतली,दोघेही मुले शिक्षित असुन त्याच्यावर पोलीस विभागाकडुन जर गुन्हा दाखल झाला ,तर पूढिल आयुष्यात त्यांना शिक्षनात, नौकरी घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.या प्रकारच्या विषायावर सकारात्मक चर्चा करण्यात आली,दोंघानाही व्यवस्तितपने समज घालण्यात आली,पुढील आयुष्यात या प्रकारचे तंटे कधीही करनार नाही, अश्या प्रकारचे पत्र तंटामुक्ती समिती नी तरुणांकडून लिहुन घेतले, आणि पोलीस निरीक्षक मॅडम ला वचन दिले,दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेऊन दिलगिरी व्यक्त करीत हात मिळवनी केली. करीता पोलीस स्टेशन तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.