गेल्या १० वर्षांपासून निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन संस्थापक सचिन घोडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करीत असते. यात आरोग्य शिबिर, क्रीडा, महिलांच्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेत असते. यावर्षी देखील हा महोत्सव साजरा करण्यात आला. सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबवून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पार पडले. यावेळी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीचे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरात गावातील गरजू नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने निःशुल्क कर्णयंत्र वितरित करण्यात आले. सोबत १०० महिलांसह महाराजांची महाआरती करण्यात आली. नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. निरंतर ५ वर्षांपासून रक्तदान करीत असलेल्या रक्तदात्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या
दहा वर्षांपासून आयोजनात सातत्य
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी सभापती अजय बोढारे, माजी सरपंच सुनील कोडे, सरपंच मीना शेन्डे, उपसरपंच शुभम हटवार, माजी सरपंच कमलाकर शेन्डे, माजी उपसरपच अभय भगत, समाजसेवक सुरेश घोडे, ग्रा. पं. सदस्य कुणाल कानफाडे, मंगला भगत, निःस्वार्थ संयोजक सौरभ भगत, तुषार देशमुख, संकेत घोडे, कुणाल हटवार, मनोज चरडे, लोकेश घोडे, विक्की धरमारे, आकाश डाहाके, प्रशांत घोडे, दिलीप काष्टे, मयूर धरमारे, प्रणय
चरडे, सुमित मेश्राम, सुरेंद्र वैध, सचिन गायधने, हरीश बाळबुधे, सत्यम मेश्राम, अनिकेत मेश्राम, हर्षाली घोडे, कोकीळा मेश्राम, प्रीती गजभिये, छबू घोडे, सीमा काष्टे, वैशाली वैद्य, प्रांजली काष्टे, रत्नपाल भगत, कवडू वैद्य, प्रथमेश काष्टे, संजय चरडे, शंकर ठाकरे, नंदू घोडमारे, मोंटू चरडे, करण चरडे, यश बाळबुधे, मंगेश मेश्राम, सुभाष बोरकर, शंकर मेश्राम, रामकुमार वरखडे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण चरडे, राजेंद्र मेश्राम, उत्तम मेश्राम, सुरेश वरठी या सर्व मंडळीचे विशेष संयोग लाभला.






