नागपूर शहरात वाहनधारकांना मूबलक सीएनजी गॅस उपलब्ध करून द्या - सचिन घोडे यांच्या नेतृत्वात नि:स्वार्थ फाउंडेशनचे निवेदन

नागपूर
नि:स्वार्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन घोडे यांच्या नेतृत्वात वाहनधारकांसह शनिवारी (९ एप्रिल) विटाभट्टी चौक, आॅटोमोटिव्ह चौकजवळील रॉव्हमेंट आॅटोमोटिव्ह सीएनजी पंपच्या व्यवस्थापकांना आॅटोप्रमाणे शहरातील सीएनजी वाहनधारकांना मूबलक गॅस उपलब्ध करून द्या. तसेच राज्यातील इतर शहराप्रमाणे नागपुरात सीएनजीचे दर घेण्यात यावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. अन्यथा, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
निवेदनानुसार, राज्याची राजधानी असलेल्या नागपूर शहरात असलेल्या तिन्ही सीएनजी गॅस पंपावर फक्त आॅटोवाल्यांना गॅस उपलब्ध होत आहे. कारचालकांना तारखांवर तारखा देण्यात येत असल्याबाबत तसेच राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूर शहरात सीएनजी गॅसचे दामदुप्पट भाव घेण्यात येत असल्याच्या मोठ्या संख्येने वाहनधारकांनी तक्रारी सचिन घोडे यांच्याकडे मांडली. शहरात मोठ्या संख्येने वाहनधारकांनी खर्च करून आपल्या वाहनात सीएनजी किट बसवून घेतली. मात्र, शहरातील तिन्ही सीएनजी पंपावर गॅस उपलब्ध होत नसल्याने वाहनधारकांमध्ये असंतोष खदखदत आहे. याचा कोणत्याहीक्षणी मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. देशभरातील वाहनधारकांना सीएनजी गॅसच्या वापराबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार आवाहन करीत असतात. मात्र, त्यांच्याच शहरात सीएनजी गॅस वाहनधारकांसाठी उपलब्ध नसल्याने वाहनधारकांच्या नाराजीतून कुठलेही गालबोट लागू नये, याकरिता पंप व्यवस्थापकांना सावध करण्याच्या हेतूने सचिन घोडे यांच्या नेतृत्वात पंप व्यवस्थापकांना शहरातील वाहनधारकांना मूबलक गॅस उपलब्ध करून द्यावा. तसेच राज्यातील इतर शहराप्रमाणे दर आकारण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी पंप व्यवस्थापकांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदनाच्या प्रतिलिपी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी विमला आर., महाव्यवस्थापक सीएनजी, नागपूर तसेच माजी मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आल्या. निवेदन देताना शिष्टमंडळात फाउंडेशनचे दिलीप काष्टे, प्रशांत राऊत, शुभम हटवार, गोपाल हटवार आदींची उपस्थिती होती.